ऑनलाईन टीम / बेंगळूर
कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भाजप पक्ष प्रवेशाचे कारण स्पष्ट केले आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते. असं ही आमदार पाटील यांनी सांगितलं. आमदार पाटील हे काँग्रेस आणि जनता दल-सेक्युलर (जेडीएस) मधून भाजपमध्ये सामील झालेल्या १६ आमदारांपै की एक होते.
आमदार पाटील म्हणाले की, मला काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र “मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही. त्यावेऴी मला पाहिजे तेवढे पैसे मागता आले असते. मात्र आपण तसे केले नाही. आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी मंत्री पद आवश्यक आहे. म्हणुनच मी मंत्री पदाची मागणी करतो आहे. असे ते म्हणाले. मला माहित नाही की मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असं आश्वासन मला देण्यात आलंय. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझं बोलणं झालंय,” असंही पाटील यांनी सांगितलं.