बेंगळूर/प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) ११ सप्टेंबरला कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे.
बेंगळूर, आयएमडीचे संचालक सी. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या किनारी भागात ९ ते १३ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड येथे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
उत्तरा कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० आणि १२ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जरी केला आहे. ९ आणि १३ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जाहीर केला. उत्तर अंतर्गत कर्नाटक भागात ९ सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि १० ते १३ सप्टेंबरला सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती आयएमडीने एका निवेदनात दिली आहे.
तर बेळगाव, धारवाड, हवेरी, गदग, बिदर, कलबुर्गी, रायचूर येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे १० ते १३सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट जाहीर केला आहे. कर्नाटकात ९ ते १३ सप्टेंबरपासून सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.