बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट करून सांगितले आहे. शुक्रवारी मंत्री अंगडी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पिझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने ते उपचार घेत असल्याचे म्हंटले आहे.
कर्नाटकमधील बेळगाव लोकसभेचे खासदार असलेले मंत्री अंगडी यांनी ट्विटरवर मी आज कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. मी ठीक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करावी, असे म्हंटले आहे.