बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी गुरुवारी राज्यातील कोरोना मृत्यू दर कमी करण्यासाठी राज्य सरकार काम करीत आहे.
सध्या राज्यात सर्वत्र साथीच्या आजारामुळे मृत्यू दर १.६२ टक्के आहे. त्यामुळे हे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासंदर्भात योपजि त्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. मंत्री सुधाकर हे बेंगळूरमध्ये राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (आरजीयूएचएस) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे ६,८०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 2357 एकट्या बेंगळूर (शहरी आणि ग्रामीण) मधील आहेत.