बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी तातडीच्या मदतकार्यासाठी ५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच पावसाने बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये तातडीच्या मदत कार्यांसाठी ५० कोटी देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंत्र्यांना तातडीने बाधित झालेल्या भागात कामे करण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. मदत कामांसाठी अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रभारी मंत्र्यांना बाधित भागात दौरा करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातच राहून, मदत वाटपाची खात्री करुन घेण्याचे आणि बाधित लोकांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू करण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.