बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचे डोळे काढावे लागत आहेत. देशात दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरातनंतर कर्नाटकमध्ये कोविड -१९ मधील रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस किंवा ‘ब्लॅक फंगस’ चा संसर्ग झाला आहे. या रोगावर वेळीच आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे अॅम्फोटेरिसिन-बीच्या २५ हजार डोसची मागणी केली आहे.
कोरोना रूग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणून ओळखल्या जाणार्या म्युकर मायकोसिसचा धोका ओळखून कर्नाटक सरकारने केंद्राला अॅम्फोटेरिसिन बीचे २५ डोस पुरवण्यास सांगितले आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी, “व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सहा राज्यांतील आपल्या सहकाऱ्यांसमवेत अॅम्फोटेरिसिन बीच्या २५ हजार डोसची मागणी केल्याचे सांगितले.” यावेळी मंत्री सुधाकर म्हणाले, स्टेरॉइड्सचा जास्त वापर केल्यामुळे काळ्या बुरशीचे प्रमाण कोविड रुग्णांमध्ये दिसून येत आहे. “कर्नाटक आणि महाराष्ट्रात असे रुग्ण आढळून येत असल्याचे ते म्हणाले.