ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेने मस्कबाबत मोठी घोषणा केली आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनी मास्क घालण्याची गरज नसल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर जवळपास सर्वच देशांमध्ये बंधनकारक आहे. मात्र, अनेक देशात लसीकरणाने वेग घेतला आहे. त्यामुळे काही देश कोरोना नियम शिथिल करत आहेत. इस्राईलने पहिल्यांदा मास्क फ्री ची देशात घोषणा केली.
त्यानंतर आता अमेरिकेत सीडीसीने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार अमेरिकेत ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. पण ज्यांचे लसीकरण अजुनही झाले नाही, त्यांना मास्क बंधनकारक असेल, असे बायडेन यांनी सांगितले.