प्रतिनिधी/कोल्हापूर
कळे येथील यशवंत सहकारी बँकेवरील दरोडय़ाप्रकरणी आंतरराज्य टोळीतील चार फरारी आरोपींना अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुल 15 जीवंत काडतुसे, एक मोटार आणि 11 हजार 795 रुपयांचे 5 व 10 रुपयाची कॉईन असा 7 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांने केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.
बाबू कौसर खान (वय 46, रा. पीर बहोडा, ता. बरेली, उत्तरप्रदेश), फसाहत उर्फ तहजीबआलम कल्लू खान (वय 36), नवाजिश ननसार अली (वय 34), गुडडू इश्तयाक अली (वय 44, तिघे रा. ककराला, ता. दातागंज, जि. बदायुँ, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहे. हे चौघेही सराईत गुन्हेगार आहेत. या चौघांच्या अंग झडती वेळी बाबू कौसर खान व फसाहत उर्फ तहजीबआलम कल्लू खान या दोघाच्या कमरेला अवैधपणे अडकविलेली गावठी बनावटीची पिस्तुल 15 जीवंत काडतुसे मिळून आली. तर त्याच्या मोटारीतील बॅगेतून 11 हजार 795 रुपयांचे 5 व 10 रुपयाची कॉईन मिळून आले.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, जिह्यात गॅस कटरच्या सहाय्याने बॅका आणि ज्वेलर्स फोडण्यात आले होते. त्या गुह्यातील आरोपीचा शोध घेण्याविषयी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले होते. त्यावरुन या शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांचे पथकाने शोध मोहिम हाती घेतली आहे. याचदम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांचे पथक जिह्यात यापूर्वी बँक आणि ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीच्या गुह्यातील अटक करण्यात आलेले राज्यासह परराज्यातील आरोपीच्या वास्तव्याविषयी माहिती घेत होते. याचदरम्यान पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना बाबू खान, फसाहत उर्फ तहजीबआलम खान, नवाजिश अली, गुडडू अली हे चौघे गुन्हेगार दरोडा टाकण्यासाठी पांढऱया रंगाच्या मोटारीतून सांगली फाटा ते गांधीनगर फाटा या परिसरात आल्याविषयी माहिती मिळाली. त्यावरुन त्याचा शोध सुरु केला असता हे चौघे जण मोटारीतून या परिसरातील एका फर्निचरच्या दुकानालगत थांबल्याचे दिसून आले. त्यावरुन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुल 15 जीवंत काडतुसे, एक मोटार आणि 11 हजार 795 रुपयांचे 5 व 10 रुपयाची कॉईन असा 7 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
या चौघाकडे अधिक चौकशी केली असता त्यानी गेल्या वर्षी कळे येथील यशवंत सहकारी बँकेवर पडलेल्या दरोडय़ाप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या चाँदखान अब्दुलनबी नईमखान आणि गुडडू उर्फ तसद्दुअली अब्दुलनबी नईमखान या दोघा साथिदाराच्या बरोबर दरोडा टाकल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे मिळून आलेले गावठी बनावटीचे पिस्तुले यशवंत बँकेवरील दरोडय़ावेळी जवळ बाळगले होते, अशी माहिती त्यानी दिली आहे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
बेळगाव जिह्यात व आंधप्रदेश, तामिळनाडू राज्यातील दरोडे उघडकीस
चौकशी दरम्यान अटक केलेल्या चौघांनी खानापूर (जि.बेळगाव), तामिळनाडू राज्यातील अनचिट्टी (जि.कृष्णगिरी) आणि आंधप्रदेशातील मामीदिकुदू (जि. पुर्व गोदावरी) येथील एसबीआय बँकेवर अकरा जणानी मिळून दरोडा टाकून या बँकेतील रोकड लुटल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली रक्कम ही बँक दरोडय़ातील असल्याचे निष्पन्न झाले. या अकरा जणाच्या टोळीमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.