प्रतिनिधी /बेळगाव
काकती येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात रविवारी येथील सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने देवदेवतांच्या भग्न प्रतिमा जमविण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
रविवारी सकाळी सिद्धेश्वर मंदिर परिसरात नागरिकांनी सोडून दिलेल्या प्रतिमा गोळा करण्यात आल्या. देवदेवतांचा अपमान टाळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. उघडय़ावर भग्न प्रतिमा टाकून दिल्यानंतर त्यावर घाण साचते व त्यांची अवहेलना होते, याविषयी जागृतीही करण्यात येत आहे.
याबरोबरच मंदिर परिसरात बेल वृक्षाचे रोपण करण्यात आले. या उपक्रमात वीरेश हिरेमठ यांच्यासमवेत सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी बसय्या हिरेमठ, मल्लय्या हिरेमठ, सिदराई बुदनूर, बाळू कणबरकर, यल्लेश होळकर, लिंगय्या बुर्लकट्टी, महांतेश चचडी, शिवराज तरळे आदी उपस्थित होते.