प्रतिनिधी /बेळगाव
आनंदवाडी येथील युवक मंडळाच्यावतीने रविवारी डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक औषध देण्यात आले. परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेतला. डेंग्यू व चिकुनगुनियाचे शहरात रुग्ण वाढत असल्याने युवक मंडळाने हा उपक्रम राबविला. यावेळी शशिकांत रणदिवे, शशिकांत पाष्टे, वैभव खाडे, विकास गवी, मंगेश काकतीकर, संजू मोरे, विठ्ठल गंगाणे, हेमंत पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.