प्रतिनिधी/ रत्नागिरी
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई व केरळ विद्यापीठातील मत्स्यपालन आणि महासागरीय अभ्यास विद्यापीठातील वैज्ञानिकांनी जैवविविधतेने संपन्न उत्तर भागातून ‘फिलामेंट बार्ब’ नावाच्या नवीन माशाच्या प्रजातीचा शोध लावला आह़े ही प्रजाती पश्चिम घाटाच्या रत्नागिरीतील काजळी नदीच्या पर्वतीय प्रवाहामध्ये आढळून आली आह़े या प्रजातीला ‘डॉकिन्सिया उत्तरा’ असे नाव देण्यात आले आह़े
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील नद्यांमधून ही नवीन प्रजात सापडली आह़े या प्रजातीचा शोध घेणारे संशोधक उन्मेश कटवटे यांच्या मातोश्री उत्तरा कटवटे यांच्या स्मरणार्थ या नवीन प्रजातीचे नाव ‘डॉकिन्सिया उत्तरा’ असे ठेवण्यात आले आह़े पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील गोडय़ा पाण्याचे स्त्रोत नामशेष होत चालले आहेत. या प्रजातींचा अधिवास गोडय़ा पाण्यात असल्यामुळे ही प्रजाती वाचवण्याची तातडीची आवश्यकता असल्याचे या अभ्यासात ठळकपणे †िदसून आले आह़े
जगभरात या माशाला ‘फिलामेंट बार्ब’ नावाने ओळखले जात असून या माशांमधील नवी प्रजाती काजळी नदीमध्ये सापडल़ी नव्या प्रजातीला डॉकिन्सिया उत्तरा हे शास्त्राrय नाव देण्यात आले आह़े ही प्रजाती प्रामुख्याने भारतासह श्रीलंकेमधील नद्यांमध्ये आढळून येत़े नुकत्याच रत्नागिरीतील काजळी नदीमध्ये आढळलेल्या या नवीन प्रजातीमुळे फिलामेंट बार्बच्या ज्ञात प्रजातींची संख्या एकूण 13 इतकी झाली आह़े जगभरातील मत्स्यप्रेमींच्या छंदात हे मासे खूपच लोकप्रिय असून या प्रजातींचा व्यापार करण्यास मात्र बंदी आह़े पश्चिम घाटाची गोडय़ा पाण्यातील नद्यांच्या स्त्राsतांमध्ये या प्रजातींच्या माशांच्या अधिवासाचे ठिकाण आह़े फिलामेंट बार्ब या नवीन प्रजातींच्या शोधामुळे स्थानिक जैवविविधतेला बळकटी मिळाली आह़े
असे संशोधन होणे गरजेचे
डॉकिन्सिया कुळातील ‘फिलामेंट बार्ब’ या नावाने ओळखल्या जाणाऱया माशांच्या रत्नागिरीमधील काजळी नदीमध्ये सापडलेल्या नव्या प्रजातीचे नाव डॉकिन्सिया उत्तरा असे ठेवण्यात आले आह़े आपल्या पश्चिम घाटातील सागरी तसेच गोडय़ा पाण्यातील जैवविविधता हा नेहमीच संशोधकांच्या अभ्यासाचा विषय राहिला आह़े त्यात असे संशोधन होणे गरजेचे आह़े या संशोधनानिमित्ताने आपल्याकडील गोडय़ा पाण्याच्या स्त्राsतांबद्दल एक वेगळा दृष्टीकोन समोर ठेवून त्यात अधिक संशोधन करण्याकडे लक्ष केंद्रीत करणे अधोरेखितच होईल.