हॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योजिका किम कर्दाशियां स्वतःच्या कारकीर्दीवरून चिंतेत पडली आहे. स्वतःच्या जीवनावर तयार रियलिटी शो किपिंग अप विथ द कर्दाशियन्समध्ये 27 मे रोजी सादर नव्या प्रोमोमध्ये किमने याविषयी म्हणणे मांडले आहे.
या नव्या प्रोमोमध्ये किम स्वतःची बहिण कार्टनी आणि क्लोई यांना आपण कायद्याच्या परीक्षेत नापास झाल्याचे सांगताना दिसून येते. कायद्याचे शिक्षण अत्यंत वेगळे आणि अवघड आहे. मी चार वर्षांचा कायद्याचा अभ्यासक्रम करत आहे. तर सर्वसाधारण विद्यार्थी तीन वर्षांचा करतात. यात एक वर्षानंतर तुम्हाला बेबी बार (कायद्याची परीक्षा) द्यावी लागते, जी अधिकृत बार परीक्षेपेक्षा कठिण असते असे किमने म्हटले आहे.
या चित्रफितीत किमची मार्गदर्शिका आणि वकील जेसिका जॅकसनही दिसून येते. किमला पास होण्यासाठी 560 गुणांची गरज आहे. पण किमने पहिल्या प्रयत्नात 474 गुण मिळविल्याचे जेसिका यांनी सांगितले आहे. किम आणि जेसिका यांची भेट सीएनएनचे अँकर वॅन जोन्स यांनी घडवून आणली होती.
काही काळापूर्वी किम सुटीवेळी स्वतःच्या परीक्षेचा अभ्यास करताना दिसून आली होती. पण स्वतःच्या निकालामुळे किम अत्यंत दुःखी आहे. आठवडय़ातील 6 दिवस, दिवसातील 10-12 तास अभ्यास केला होता, पास न होणे निराश करणारे आहे, सर्व सोडून पराभव मान्य करावे असे वाटत असल्याचे किमने म्हटले आहे. किम चार मुलांची आई आहे. तसेच ती स्कीम्स या नावाने स्वतःचा ब्रँडही चालवत आहे. ज्यात शेपवियर आणि परफ्यूम यासारखी उत्पादने सामील आहेत.