जिल्हा न्यायालयाचा निकाल
कोल्हापूर : प्रतिनिधी
किरकोळ कारणातून मित्रणेच मित्राचा चाकूने निर्घृण खून केल्याची घटना 2 जानेवारी 2016 रोजी उचगाव उड्डाण पूल येथे घडली होती. राजवर्धन संभाजी गवळी ( वय 20 रा. शनिवार पेठ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी शिवराज चंद्रकांत पोवार याला पोलिसांनी अटक केली होती. आज शिवराज चंद्रकांत पोवार याला जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र 1 एस. आर.पाटील यांनी दोषी ठरवले. तर सोमवारी त्याच्या शिक्षेबाबत सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारी वकील म्हणून ऍड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.