काँग्रेस निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम यांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
कुंभारजुवे मतदारसंघात काँग्रेसला विजयी करण्यासाठी गट समितीने झोकून द्यावे, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम यांनी केले आहे.
ओल्ड गोवा-कदंब पठारावरील हॉटेल रोनाल्डो मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभारजुवे मतदारसंघ काँग्रेस गट समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीच्या शेवटी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले समाजसेवक राजेश फळदेसाई यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन केक कापण्यात आला.
यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रभारी दिनेश गुंडुराव, काँग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलेक्स सिक्वेरा, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिना शांताराम नाईक, ऍड. रमाकांत खलप, कुंभारजुवे गट अध्यक्ष विशाल वळवईकर, पदाधिकारी सेबी मिनेझिस अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चिदंबरम व अन्य नेत्यांनी गट समितीला आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. गट समितीने कोणती कामे पार पाडावीत, कार्यकत्यांनी कसे कार्य करावे, यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना केल्या.