प्रतिनिधी / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथील कुंभोज ग्रामपंचायतीच्यावतीने बाजारात होत असलेली वाहतुकीची कोंडी अस्ताव्यस्त बसलेले भाजीपाला विक्रेते, यातून होत असलेली तक्रारी सोशल मीडियावरील बातमीची दखल घेऊन नुकताच कार्यभार स्वीकारलेले ग्राम विकास अधिकारी ए एस कठारे यांनी अस्ताव्यस्त बसणारे व्यापारीभाजीपाला विक्रेते बाजार दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी यांना शिस्त लावण्यास बुधवार व रविवारचा बाजार पासून सुरुवात केली आहे. त्याला व्यापारीवर्ग ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी मंगळवारी व शनिवारी रात्री चॉकपीठटचे पट्टे मारण्यात आले होते. पट्ट्याच्या आत भाजीपाला विक्रेता व्यापारी यांना बसवण्यात आले, परिणामी ग्रामपंचायतीने आपण दिलेल्या नियमांची कोणी अंमलबजावणी करत नसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पत्र नुतन ग्राम विकास अधिकारी कठारे यांनी व्यापारी वाहतूकदार व हातकणंगले पोलिसांना दिले आहेत.
त्याच पद्धतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रत्येक आठवडी बाजारात स्वतः उपस्थित राहून व्यापाऱ्यांना नियमावली समजावून सांगून चुकीच्या ठिकाणी उभा करण्यात येणारी वाहने योग्य ठिकाणी उभी करण्यासाठी व्यापाऱ्यांना सहकार्य केले, परिणामी कुंभोज बाजारातील गेल्या पंचवीस वर्षापासून असणारा वाहतुकीचा अडथळा ग्रामपंचायतीच्या नियमावलीमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला असून ग्रामस्थांतून व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
आठवडा बाजारात उभी असणाऱी रस्त्यावरील वाहने पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत होती, परिणामी नुतन ग्रामपंचायत नियमानुसार पार्किंग होणारे वाहन पांढऱ्या पट्ट्याच्या आत लावण्यात आली होती. ग्राम विकास अधिकारी ए एस कठारे, प्रशासक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी शांतु धरणगुत्ते ,अमर पवार, अमोल शिंदे राहुल कांबळे, अशोक अंबी, राजु कुंडले यांनी सकाळ पासून बाजारसपे पर्यंत परिश्रम घेतले.