नरगुंदकर भावे चौकात मोकाट कुत्र्यांचा हैदोस
बेळगाव : आपले काम संपवून जेवणासाठी जाणाऱया नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना बुधवारी दुपारी नरगुंदकर भावे चौक येथे घडली. केवळ कोरोनानेच नव्हे तर विविध समस्यांनी सध्या बेळगावकरांची सत्त्वपरीक्षा सुरू आहे. कोरोनाची लस उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. त्याचवेळी रेबीज, सर्पदंशाचे इंजेक्शन वेळेवर मिळेल अशी शक्मयता नाही. त्यामुळे ज्या नागरिकांचा कुत्र्याने चावा घेतला त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
नरगुंदकर भावे चौक येथे सकाळी बाजार भरतो. दुकाने 10 पर्यंत उघडी असतात. त्यानंतर या परिसरात पूर्ण शुकशुकाट असतो. भाजी विपेते निकृष्ट माल येथेच टाकून जातात. तसेच काही खाद्यपदार्थही उघडय़ावर पडलेले दिसतात. ते खाण्यासाठी मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री यांचा येथे वावर वाढला आहे. त्यामुळेच येथून ये-जा करणारे नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरत आहेत. मंगळवारी दुपारी दोन महिलांसह एकूण पाच जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला. त्यांच्याकडे इंजेक्शन घेण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. गणपत गल्ली येथील पावले प्लास्टीकचे संचालक संतोष पावले यांनी दोन महिलांना इंजेक्शन घेण्यासाठी पैसे देऊन पाठविले. तसेच त्यांनी मनपा अधिकाऱयांना याबाबत माहिती दिली. परंतु कोरोना असल्याने आम्ही काय करणार, असे उत्तर त्यांना मिळाले. कोरोनाबरोबरच इतर समस्यांची मनपाने दखल घ्यावी. तसेच अशा समस्या केवळ मनपाच्या दुर्लक्षामुळे होत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.