प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी- शेटफळ रोडवर मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे .ही घटना बुधवार दि. १६ रोजी सायं ७.३० वा सुमारास कुर्डुवाडीपासून एक कि.मी अंतरावर असलेल्या ओढ्याजवळ घडली.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम एच ४५ क्यु 3662 व मालट्रक क्रमांक एम एच १२एफ झेड८८९० यांच्या मध्ये झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकलवरील एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीस कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार सुरु आहेत.
या अपघातातील जखमी व मयत यांची नावे समजू शकली नाहीत. या मार्गावरील पुलाचे काम सुरु असल्याने पुलाच्या पुढच्या बाजूला मातीचा ढिगारा टाकला आहे .या मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने अपघात घडला असल्याची शक्यता आहे.