वृत्तसंस्था/ इस्तंबुल
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इस्तंबुल खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या युजीन बुचार्डने रशियाच्या कुझेनत्सोव्हाचा दुसऱया फेरीत पराभव करत पुढील फेरी गाठली.
दुसऱया फेरीतील सामन्यात बुचार्डने रशियाची टॉप सिडेड कुझेनत्सोव्हाला 7-6 (7-3), 6-7 (5-7), 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. बुचार्डने 2014 साली विंम्बल्डन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होते आता बुचार्डचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना कोव्हिनिकशी होणार आहे. कोव्हिनिकने दुसऱया फेरीतील सामन्यात सहाव्या मानांकित युटेव्हॅनिकचा 6-3, 6-4 तसेच हेरकॉगने पालोनीचा 7-5, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.