बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात वाढत्या कोरोना संख्येमुळे रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. बेडसाठी रुग्णांना रुग्णालयाबाहेर ताटकळत थांबावे लागत आहे. कोलारमध्ये कोविड -१९ रुग्णांना उपचारासाठी बेडची कमतरता भासत असताना वाढत्या मागणीच्या अनुषंगाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वनाथनारायण यांनी मंगळवारी जाहीर केले की जिल्ह्यात आणखी ४५० बेड लवकरच जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील.
उपमुख्यमंत्र्यांनी मात्र बेंगळूरपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनची कमतरता असल्याचे सांगितले. “तथापि, आम्ही एसएनआर रुग्णालयाच्या आवारात६ हजार लिटर ऑक्सिजन साठवण सुविधा आणि १ हजार लिटर / मिनिट क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापित करून भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.
उपमुख्यंमत्री अश्वनाथनारायण यांनी अधोरेखित केले की जिल्ह्यात अस्तित्त्वात असलेल्या ३०० रूग्णालयात ३०० हुन अधिक ऑक्सिजनयुक्त बेड आणि आणखी १५० आयसीयू बेडउपलब्ध करून दिले जातील