कोल्हापूर : प्रतिनिधी
आरडेवाडी ( ता. करवीर ) येथे शेत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबीयांमध्ये राडा झाला. यामध्ये तिघाच्यावर खूनी हल्ला करण्यात आला. या तिघापैकी एका गंभीर युवकाचा सोमवारी दुपारी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यु झाला. आदिनाथ गोपीनाथ वाकरेकर (वय २८ } असे त्यांचे नाव आहे. सीताराम मारुती वाकरेकर व पांडुरंग ज्ञानू वाकरेकर या दोघा गंभीर जखमीची प्रकृती नाजूक बनली आहे. यांच्यावर कोल्हापूरातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे.
तसेच या राड्यात मृत आदिनाथ वाकरेकर, गंभीर जखमी सीताराम वाकरेकर, पांडूरंग वाकरेकर या तिघासह दोन्ही कुटूंबातील १६ जण जखमी झाले. या सर्वाच्यावर वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या राड्यात दोन्ही गटाकडून विळे आणि काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी एका कुंटूंबातील दहा तर दुसऱ्या कुटूंबाच्या चौदा अशा चोवीस जणांविरोधी गुन्हे दाखल केले. तर चोवीस पैकी शरद वाकरेकर, महिपती वाकरेकर, काशिनाथ वाकरेकर, गोपीनाथ वाकरेकर या चौघांसह आठ अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, आरडेवाडी येथील शरद नामदेव वाकरेकर व सिताराम मारुती वाकरेकर या दोघाच्या कुटूंबात गावातील शेत जमिनीवरून वाद आहे. रविवारी दुपारी या शेतजमिनीतील गवत कापणे वरून, या दोन कुटूंबातील वाद उफाळून येवून राडा झाला. यामध्ये विळा आणि काट्यांचा सर्रास वापर करण्यात आला. या राड्यात शरद वाकरेकरसह यांच्या कुटूंबातील आदिनाथ गोपीनाथ वाकरेकर, पांडुरंग ज्ञानू वाकरेकर, ज्ञानू गोपाळा वाकरेकर, गोपीनाथ ज्ञानू वाकरेकर, साहिल काशिनाथ वाकरेकर, काशिनाथ ज्ञानू वाकरेकर, महिपती ज्ञानू वाकरेकर, सुनंदा काशिनाथ वाकरेकर, छाया नामदेव वाकरेकर व वालुबाई गोपीनाथ वाकरेकर असे ११ जण जखमी झाले.
तर सिताराम वाकरेकरसह यांच्या कुटूंबातील विष्णू वाकरेकर, कृष्णात वाकरेकर, देवाजी वाकरेकर व विक्रम वाकरेकर असे पाच जण जखमी झाले. या दोन कुटूंबातील तिघे गंभीर जखमी झाले. तर तेरा जण किरकोळ जखमी झाले. यासर्व १६ जखमीना उपचारासाठी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी करवीर पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. जखमी शरद वाकरेकर यांनी अजित वाकरेकर, अंकुश वाकरेकर सीताराम वकारेकर, कृष्णात वाकरेकर, देवाजी वाकरेकर, विष्णू वाकरेकर, विक्रम वाकरेकर, अरुण वाकरेकर, सरिता वाकरेकर व शारदा वाकरेकर या दहा जणांविरोधात तर जखमी सिताराम वाकरेकर यांनी शरद वाकरेकर, महिपती वाकरेकर, काशिनाथ वाकरेकर, ज्ञानू वाकरेकर, गोपीनाथ वाकरेकर, नामदेव वाकरेकर, आदिनाथ वाकरेकर, साहिल वाकरेकर, भरत वाकरेकर, वालुबाई वाकरेकर, छाया वाकरेकर, सुनीता वाकरेकर यांच्यासह लवटे व अनिल ( दोघाची पूर्ण नाव व पत्ता माहित नाही ) या चौदा जणांविरोधात फिर्यादी दाखल केली आहे.
तिघांवर खुनी हल्ला
या राड्यात आदिनाथ वाकरेकर, सीताराम वाकरेकर व पांडुरंग वाकरेकर या तिघावर विळ्याने खूनी हल्ला करण्यात आला. त्यामुळे हे तिघे गंभीर जखमी झाले. त्याच्यासह अन्य सर्व जखमीना त्वरीत उपचारासाठी कोल्हापूरात आणण्यात आले. पण उपचारा दरम्यान आदिनाथचा मृत्यु झाला. या राड्याने आरेवाडी गावात तणाव पूर्ण शांतता असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनास्थळाला व गावाला करवीर पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी भेट दिली.