प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 31 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 519 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 728 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 528 झाली आहे. कोरोना मृत्यूची संख्या कमी झाली असून सक्रीय रूग्णसंख्येत घट झाली आहे. जिल्हय़ातील एकूण कोरोना बळी 4 हजारांवर पोहोचली आहे.
जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 31 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 29 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 110, नगरपालिका क्षेत्रात 621, शहरात 812 तर अन्य 486 आहेत. मृतांमध्ये जिल्हय़ांतील 29 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 728 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 10 हजार 236 झाली आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1 हजार 519 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 53, भुदरगड 35, चंदगड 30, गडहिंग्लज 51, गगनबावडा 7, हातकणंगले 179, कागल 40, करवीर 339, पन्हाळा 100, राधानगरी 33, शाहूवाडी 4, शिरोळ 52, नगरपालिका क्षेत्रात 153, कोल्हापुरात 407 तर अन्य 36 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 26 हजार 793 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 2 हजार 959 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 420 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 4 हजार 65 अहवाल आले. त्यातील 3 हजार 514 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 397 रिपोर्ट आले. त्यातील 926 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 8 हजार 521 स्वॅब रिपोर्ट आले.
शहरातील 9, परजिल्हय़ांतील दोघांचा कोरोनाने मृत्यू
दरम्यान, बुधवारी कोरोनाने मृत्य़ू झालेल्यांत परजिल्हय़ांतील मुंबई आणि बेळगाव येथील दोघे तर शहरातील कनाननगर, जवाहरनगर, लक्षतीर्थ वसाहत, साने गुरूजी वसाहत, संभाजीनगर, जीवबा नाना पार्क, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, गंगावेश येथील व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.
कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 407 1112 1519
आजपर्यतचे बाधीत 36602 90784 1,26,784
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1728 1,10,236
दिवसभरातील मृत्यू 9 22 31
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 812 3317 4029
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 497 2420 2959
अँटीजेन 551 3514 4065
ट्रुनेट 471 926 1397