ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात प्रदेशात 709 नवे रुग्ण आढळून आले. तर 1,706 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना अपर मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, प्रदेशात सद्य स्थितीत 959 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणत घट
पुढे ते म्हणाले की, मागील 40 दिवसांपासून सक्रिय रुग्ण संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामूळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून सध्या हे प्रमाण 98 टक्के इतके आहे. पुढे ते म्हणाले मागील 24 तासात 2,89,809 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत 5,21,98,161 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
- लसीकरणाचा डाटा
मागील 24 तासात प्रदेशात 4,30,616 जणांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत 1 कोटी 74 लाख 71 हजार 652 जणांनी पहिली लस टोचून घेतली आहे. तर यातील 36,78,606 जणांनी दुसरा डोस देखील घेतला आहे. तर प्रदेशात आतापर्यंत 2,11,50,258 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.