प्रतिनिधी / पाचगाव
पाचगावमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारपर्यंत पाचगावमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११५ झाली आहे तर आतापर्यंत चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे पाचगावकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पाचगावमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे १५ जुलै रोजी पाचगावमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. रविवारी आर. के. नगर येथील दीप सेवक सोसायटीमधील एका वृद्धाचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पाचगावमधील एकूण ११५ रुग्णांपैकी ७० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर आतापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.