प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये महाडिक-पी एन. नरके सत्ताधारी `मनपा’ गटाच्या विरोधात मोट बांधण्यास पालकमंत्री सतेज पाटील यांना यश आले. त्याबरोबर सत्ताधारी आघाडीला खिंडार पडल्याचेही स्पष्ट झाले. तथापि ही विरोधकांची खेळी की संचालकांचे बंड हे येत्या काही दिवसापत स्पष्ट होईल मात्त या घडामोडी पहाता गोकुळचे राजकारण वेगळÎा टप्प्यावर पोहचले आहे. या सर्व घडामोडी सत्ताधारी गट कशा पद्धतीने घेतो यावरही गोकुळच्या राजकारणाची पुढील दिशा ठरु शकते.
गेली पंधरा दिवसांपासून गोकुळच्या निवडणुकीची हवा तापली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पी. एन. पाटील यांच्यातील बोलणी तीन जागांच्यावर थांबल्याने ऐन निवडणुकीत तोडघशी पडण्यची वेळ येवू शकते. याचा अंदाज आल्यानेच सोमवारी तीन मंत्र्यांनी आघाडीची घोषणा करुन निवडणुकीची दिशा स्पष्ट केली. विरोधी आघाडीने रणशिंग फुंकल्याने सत्ताधारी आघाडी या भूमिका घेते याकडे जिल्हÎातील शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी आघाडीला खिंडार पाडण्यात यश
दोन दिवसापूर्वी महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांनी सत्ताधारी संचालकांची प्राथमिक चर्चा करण्यासाठी बैलावलेल्या बैठकीकडे सात संचालकांनी पाठ फिरवली होती. याच वेळी महाडिक, पी. एन. पाटील यांना अंदाज आला असावा. सोमवाच्या पत्रकार परिषदेस विद्यामान संचालक अरुणकुमार डोंगळे, विश्वास पाटील, संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांच्य पत्नी जयश्री पाटील, अनुराधा पाटील सरुडकर यांनी उपस्थित लावत एकच धक्का दिला.
अमरिष घाटगे कुठं आहेत ?
गतवेळी महाडि विरुद्ध सतेज पाटील अशा अतितटीच्या निवडणुकीती चंद्रकांत बोंद्रे, अमरिषसिंह घाटगे दोघेजन विजयी झाले. निवडणुकीनंतर काही महिन्यात चंद्रकांत बोंद्रे यांचे निधन झाले तर विजयाचा गुलाल पुसण्यापूर्वी घाटगे महाडिक यांना जाऊन मिळाले. कागल तालुक्यातील बदललेल्या राजकारणात संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना मिठी मारली. त्यामुळे गोकुळमध्ये ते मुश्रीफ- पाटील यांच्यासोबत असतील अशी अटकळ होती. मात्र आजच्या घडामोडीत ते कुठंच दिसले नाहीत. त्यामुळे विरोधी आघाडीचे एकमेव संचालक अमरिष घाटगे कुठं आहेत.
आमदार राजेश पाटील काय करणार?
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी असा प्रवास करुन सध्या राष्ट्रवादीच्या गोटात स्थीरावलेले आमदार राजेश पाटील यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे ते आजच्या बैठकीस येतात काय याकडे जिल्हÎाचे लक्ष लागले होते. महाडिक, पी. एन, आणि विरोधी आघाडीच्या बैठकीसही ते उपस्थित नव्हते त्यामुळे ते काय करणार मुश्रीफ यांना डावलून सत्ताधाऱयांसोबत राहतात की विरोधी आघाडीत सहभागी होतात याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
विरोधी आघाडी चुयेकरांचा चेहर
गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर अपवाद वगळता नेहमीची सत्ताधारी आघाडी सोबत राहिले. पंधरावर्षापूर्वी महाडिक विरोधी आघाडीतून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयीही झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सत्ताधारी गटाने संधी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांनी अनपेक्षितपणे विरोधी आघाडीत उडी घेतली. आता तर विरोधी आघाडीने पॅनलला आनंदराव पाटील यांचाच चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. हा बदल ठरावधाकर सभासद कसा स्वीकारतात ते पहाणेही तितकेच महत्वाचे आहे.