स्पर्धेत 48 संघाचा सहभाग, मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाने स्पर्धेची सांगता
बातमीदार /खानापूर
खानापूर शहरात कॉलेज बॉईज चषक क्रिकेट स्पर्धेत करंबळ येथील श्री धोंडदेव क्रिकेट संघ जेतेपदाचा मानकरी ठरला. त्यांना 51 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत 48 संघानी भाग घेतला.
या स्पर्धेचा अंतिम सामना करंबळ धोंडदेव संघाविरुद्ध शिवशक्ती बैलूर यांच्यात झाला. 8 षटकांच्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती संघाने करंबळ संघासमोर 66 धावांचे आव्हान ठेवले. त्याचा पाठलाग करताना करंबळ धोंडदेव संघाने 5 गडी व 4 चेंडू राखत विजय संपादन केला.
करंबळ संघ गोपाळ दळवी, सुनिल मासेकर, विनायक घाडी, तुकाराम किणयेकर, श्रीधर चौगुले, सागर पाटील, गोटू घाडी यांच्या फलंदाजीच्या जोरावर करंबळ संघ विजयी झाला.
उपविजेत्या बैलूर शिवशक्ती संघाला 25 हजार रुपये व चषक देण्यात आले. श्रीधर चौगुले व तुकाराम किणयेकर सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. या स्पर्धेत सांघिक खेळाच्या जोरावर करंबळ संघाने जेतेपद मिळवले.
बक्षिस वितरण समारंभ
बक्षीस वितरण समारंभाला महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व भाजपाचे नेते विठ्ठल हलगेकर, भाजपा तालुकाध्यक्ष संजय कुबल, सचिव गुंडू तोपिनकट्टी, प्रकाश निलजकर, किरण यळ्ळूरकर, भरमाणी पाटील, शंकर पाटील, महमद नंदगडी, भरमाणी बेंदे, पंडित ओगले, राजाराम पाटील, शाम घाडी, नारायण काटगाळकर, देवानंद घाडी, आप्पाण्णा घाडी, सतीश घाडी, सदानंद मासेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. करंबळ संघ विजयी झाल्यानंतर चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात जल्लोष केला.