मालवण तालुक्यातील तेरा ग्रा.पं.ना भेटी
प्रतिनिधी / मालवण:
आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी गावभेटीदरम्यान असरोंडी, किर्लोस, असगणी, राठिवडे, वडाचापाट, गोळवण, चाफेखोल, कुणकवळे, नांदोस, तिरवडे, पेंडूर, काळसे, धामापूर या गावातील ग्रामपंचायतीमध्ये भेट दिली. यावेळी उपस्थित असलेले सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व गाव कमिटीशी चर्चा करत क्वारंटाईन व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. गावातील समस्या जाणून घेतल्या. त्या मार्गी लावण्याची ग्वाही नाईक यांनी दिली. गोळवण आरोग्य केंद्रालाही भेट देऊन त्यांनी डॉ. सावंत यांच्याकडून आढावा घेतला.
उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, असरोंडी येथे सरपंच स्नेहल सावंत, उपसरपंच मकरंद राणे, सुनील सावंत, किर्लोस येथे उपसरपंच दीपक किर्लोस्कर, पोलीस पाटील किशोर लाड, असगणी येथे बंडू चव्हाण, सरपंच हेमंत पारकर, राठिवडे येथे सरपंच मंजुषा धुरी, स्वप्नील पुजारे, सी. पी. सडवेलकर, वडाचापाट येथे सरपंच नमिता कासले, उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर, गोळवण येथे सरपंच प्रज्ञा चव्हाण, उपसरपंच संजय पाताडे, भाऊ चव्हाण, चाफेखोल येथे सरपंच रिता वायंगणकर, उपसरपंच वालावलकर, अल्पेश निकम, कुणकवळे येथे सरपंच शुभांगी मेस्त्राr, उपसरपंच मंदार वराडकर, देवयानी मसुरकर, नांदोस येथे उपसरपंच दीपक शंकरदास, दिलीप हंजनकर, राजू गावडे, तिरवडे येथे सरपंच विहंग गावडे, ग्रामसेवक मगम, पेंडूर येथे सरपंच साबाजी सावंत, उपसरपंच रवी गावडे, बाळ महाभोज, काळसे येथे सरपंच केशव सावंत, अण्णा गुराम, डॉ. सावंत, धामापूर येथे सरपंच सत्वशीला धामापूरकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, आरोग्य कर्मचारी, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक उपस्थित होते.