भाजपचे युवानेते श्रीनिवास पाटील यांचा विश्वास
प्रतिनिधी/ कागवाड
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक राज्यात प्रगतीचे वारे वाहत आहे. याचबरोबर आमदार व राज्याचे वस्त्राsद्योग मंत्री श्रीमंत पाटील कागवाड यांनी मतदारसंघात अनेक वर्षांनंतर हजारो कोटीचे अनुदान मंजूर करून मतदारसंघाचा विकास करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासकामाकडे पाहून काँग्रेस व इतर पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये मोठय़ा संख्येने प्रवेश करीत आहेत. येत्या ग्रामपंचायत निवडणूक अनेक गावात कमळ फुलणार आहे, असा विश्वास भाजपचे युवानेते व केंपवाड साखर कारखान्याचे एमडी श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील पुढे म्हणाले, सध्या बीजेपी पक्षाचे ग्राम पंचायत सदस्य होण्यासाठी मोठी रिघ लागली आहे. अनेकजण आपण इच्छुक असल्याचे सांगून नेत्यांची मनधरणी करताना दिसत आहेत. कागवाड मतदारसंघाच्या विकासासाठी गावागावातून ग्रामपंचायत निवडणूक प्रति÷sची न करता विकासासाठी एकत्रित येऊन निवडणुका बिनविरोध करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मतदारसंघातील गावागावातून कार्यकर्त्यांची बैठक घेत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुका बिनविरोध करण्यासाठी श्रीनिवास पाटील हे यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच त्यांना पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बागडी, सेपेटरी निंगप्पा कोकले, अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष शितल पाटील, केएमएफचे संचालक आप्पासाहेब आवताडे, आर. एन. पाटील, भरतेश पाटील, संजय तेलसंग यांच्यासह अनेक कार्यकर्ते साथ देत आहेत.