शुक्रवारी 19 जणांना कोरोना, बेळगाव शहरात 11 रुग्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी बेळगाव जिह्यातील 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 757 वर पोहोचली असून ग्रामीण भागात रुग्ण संख्या घटली आहे. एका बेळगाव शहरात 11 रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात शुक्रवारी एकही रुग्ण आढळला नाही.
राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, अन्नपूर्णावाडी, नेहरुनगर, कॅम्प, विनायकनगर, विद्यानगर, टिळकवाडी, वंटमुरी कॉलनी, संगमेश्वरनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी बिम्स्मधील एका कर्मचाऱयाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
आतापर्यंत 25 हजार 151 जणांनी कोरोनावर मात केली असून शुक्रवारी रात्री जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 265 इतकी आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 341 जण दगावले असून प्रशासनाला अद्याप 4 हजार 250 अहवालांची प्रतिक्षा आहे.
जिह्यातील 37 हजार 610 जण अद्याप 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 2 लाख 98 हजार 878 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 67 हजार 275 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. थंडीच्या पार्श्वभूमिवर डिसेंबर अखेर किंवा जानेवारीत रुग्ण संख्या वाढण्याचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे.