जमखंडी : जुन्या घराचे छत कोसळून एक महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि. 30 रोजी पहाटे घडली. सत्यव्वा ईरव्वा कमतगी (वय 52) असे मृत महिलेचे नाव आहे. सत्यव्वा झोपेत असताना पहाटे जुन्या घराचे छत कोसळल्याने त्या ढिगाऱयाखाली गाडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मुधोळ अग्निशमनचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर कोसळलेला ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.
पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी कोसळलेले घर बांधून देण्यासाठी सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन देऊन या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. याचबरोबर अरुण गोविंद कारजोळ यांनी शिरोळला भेट देऊन मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत दिली.