साहित्यः अर्धा किलो बोनलेस चिकन, 2 चमचे लसूण पाकळय़ा बारीक चिरून, 1 चमचा लिंबूरस, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा रोजमेरी, 1 चमचा रेड चिल्ली फ्लेक्स, चवीपुरते मीठ, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 4 स्लाईस ब्राऊन बेड, 1 अंडं, 1 चमचा दूध, अर्धी वाटी मैदा
कृतीः बोनलेस चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून स्वच्छ करावेत. त्यातील पाणी पूर्णपणे निथळवून बाऊलमध्ये काढावे. त्यात लसूण पाकळय़ा, लिंबूरस, कोथिंबीर, रोजमेरी, रेड चिल्ली फ्लेक्स आणि मीठ टाकून मिश्रण मॅरीनेटसाठी अर्धा तास झाकूण ठेवावे. ब्राऊन बेड गरम तव्यावर भाजून घ्यावेत. गार झाले की मिक्सरला लावून घ्यावे. तयार ब्रेडक्रम्स बाऊलमध्ये काढून त्यात जिरे पावडर आणि गरम मसाला पावडर मिक्स करावे. दुसऱया बाऊलमध्ये अंडं फोडून त्यात दूध मिक्स करून मिश्रण फेटून घ्यावे. आता मॅरीनेट चिकन अंडय़ामध्ये घोळवून नंतर मैद्यात घोळवावे. शेवटी बेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावे. आता तयार चिकन पॉपकॉर्न सॉससोबत खाण्यास द्या.