प्रतिनिधी /वास्को
आल्त चिखली वास्को येथील श्री नृसिंह सातेरी संस्थानचा महाशिवरात्री उत्सव दि. 1 व 2 मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे.
मंगळवार दि. 1 रोजी सकाळी 8 वा. यजमान श्री व सौ. सनीशा शशिकांत गावडे यांच्याहस्ते महाअभिषेक, तद्नंतर गणपती पूजन, पुण्याहवाचन, लघुरूद्र व श्रीसुक्त आवर्तन, कुंकूमार्चन मंगल आरती, सामुहीक गाऱहाणे व तिर्थप्रसाद. सायंकाळी 4 वा. गावकऱयांतर्फे यजमान श्री. व सौ. सनीशा शशिकांत गावडे यांच्याहस्ते श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 6 वा. गावकऱयातर्फे भजनाचा कार्यकम, आरती, तीर्थप्रसाद व पावणी. रात्री 8 वा. ललित कार्यक्रम.
बुधवार दि. 2 रोजी सकाळी देवीची नित्यपूजा, अभिषेक, रात्री 8 वा. पावणी व तद्नंतर रूद्र क्रिएशन निर्मित साहिल नायक प्रस्तुत व उमेश नाईक लिखित व दिग्दर्शीत ‘तेंगशेर कावळो घोवाक दुवाळो’ कोकणी विनोदी नाटक सादर करण्यात येईल.