प्रतिनिधी /वास्को
आल्त चिखली वास्को येथील श्री नृसिंह सातेरी संस्थानचा नवरात्रोत्सव दि. 7 ते 15 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यकमानी साजरा करण्यात येणार आहे. गुरूवार दि. 7 रोजी सकाळी 7 वा. गणपती पूजन, नित्य अभिषेक व घटस्थापना, तद्नंतर सायंकाळी 7 वा. ग्रामस्थातर्फे भजनाचा कार्यक्रम, तद्नंतर घुमट आरती व तीर्थप्रसाद.
शुकवार दि. 8 रोजी सकाळी 7 वा. यजमान पु. शैलेश शंभु कुर्टीक्र यांच्याहस्ते अभिषेक पूजा व सायंकाळी 7 वा. श्री नृसिंह सातेरी महिला भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, तद्नंतर घुमट आरती व तिर्थप्रसाद. शनिवार दि. 9 रोजी सकाळी 7 वा. यजमान कु. श्रीकांत कामत यांच्याहस्ते अभिषेक पूजा व सायंकाळी 4 वा. चिखली ग्रामस्थातर्फे श्री सत्यनारायण महापूजा (यजमान ः कु. समीर कामत), तद्नंतर भजनाचा कार्यक्रम, घुमट आरती व तीर्थप्रसाद.
रविवार दि. 10 रोजी सकाळी 7 वा. नित्य अभिषेक पूजा, सायंकाळी 7 वा. श्री नृसिंह सातेरी महिला भजनी मंडळ चिखली यांचा भजनाचा कार्यक्रम, तद्नंतर घूमट आरती व तीर्थप्रसाद. सोमावार दि. 11 रोजी सकाळी 7 वा. नित्य अभिषेक पूजा, सायंकाळी 7 वा. श्री नृसिंह सातेरी महिला भजनी मंडळ चिखली यांचा भजनाचा कार्यक्रम, तद्नंतर घूमट आरती व तीर्थप्रसाद. णंगळवार दि. 12 रोजी सकाळी 7 वा. नित्य अभिषेक पूजा, श्री नृसिंह सातेरी भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, तद्नंतर घुमट आरती व तिर्थप्रसाद. बुधवार दि. 13 रोजी सकाळी 7 वा. नित्य अभिषेक पूजा, 10 वा. श्री सरस्वती पूजन, सायंकाळी 7 वा. महिलांचा फुगडीचा कार्यक्रम, तद्नंतर घुमाट आरती व तीर्थप्रसाद. गुरूवार दि. 14 रोजी सकाळी 7 वा. नित्य अभिषेक पूजा, श्री नृसिंह सातेरी महिला मंडळातर्फे फुगडीचा कार्यक्रम, तद्नंतर घुमट आरती व तीर्थप्रसाद.
शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 7 वा. नित्य अभिषेक पूजा, सायंकाळी 5 वा. सोने लुटण्याचा कार्यक्रम, नंतर देवीच्या रूपवणाची एक एक काडी प्रसाद म्हणून देण्यात येईल. तदनंतर भजन, आरती, पावणी व सरस्वती विसर्जनाने उत्सवाची सांगता होईल.