पॉलिसीचे पैसे देणार असल्याचे सांगून ठकवले
चिपळूण
पॉलिसीचे पैसे द्यायचे आहेत, असे सांगून दिलेल्या अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगून चिपळुणातील एकाची 8 लाख 86 हजार 287 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रीती सिंग नामक महिलेविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद नईमा अब्दुल हमीद काळोखे (57, दादर मोहल्ला-चिपळूण) यांनी दिली. त्यानुसार 29 मे 2017 ते 18 सप्टेंबर 2017 या कालावधीत काळोखे यांची मुलगी हायफा काळोखे हिच्याकडील मोबाईल व लँडलाईनवर प्रीती सिंग नामक महिलेने फोन करून अब्दुल हमीद इब्राहिम काळोखे यांचे पॉलिसीचे पैसे द्यायचे आहेत, असे सांगून तिने दिलेल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितल होते. त्यानुसार काळोखे यांनी प्रीती सिंग हेने दिलेल्या अकाउंढट नंबरवर काळोखे यांनी एकूण 11 लाख 78 हजार 365 रुपये ट्रान्स्फर केले. काळोखे यांनी ट्रान्स्फर केलेल्या रक्कमेपैकी केवळ 2 लाख 92 हजार 122 रुपये किंमतीची इन्शुरन्स पॉलिसी कागदपत्रे काळोखे यांना मिळाली आहेत आणि उर्वरित 8 लाख 86 हजार 283 रुपयांची फसवणूक प्रीती सिंग असे नाव सांगणाऱया या महिलेने केली आहे. दरम्यान, हा फसवणुकीचा प्रकार काळोखे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.