ऑनलाईन टीम / बीजिंग :
उत्तर चीनमधील एका शहरात ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना बयन्नुरमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, आरोग्य यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या पीपल्स डेलीने याविषयी माहिती दिली आहे.
पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतामध्ये हे दोन्ही रुग्ण आढळून आढळून आले आहेत. त्यामुळे शहरामध्ये प्लेगचा संसर्ग होण्याची भिती आहे. हा प्लेग उंदारांमार्फत पसरणारा रोग आहे. उंदीर मेल्यानंतर त्याच्या शरीरावरील पिसवांच्या माध्यमातून प्लेगच्या विषाणूंचा संसर्ग मानवाला होतो. उंदारच्या शरीरावरील पिसवे मानवाचा चावल्याने प्लेगचा संसर्ग होतो.
अचानक ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुःखी, अंगदुखी, अशक्तपणा, उलट्या आणि मळमळ होणे ही ब्यूबोनिक प्लेगची प्रमुख लक्षणे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. स्थानिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जारी केलेला सतर्कतेचा इशारा हा 2020 च्या शेवटपर्यंत लागू राहणार आहे.