प्रत्येक ऋतूत घरातली बाग आणि लॉनची काळजी घ्यावीच लागते. आपल्या सुंदर बागेची जपणूक करण्याच्या या काही खास टिप्स…
* झाडांना नियमित पाणी घाला. नुसतं पाणी शिंपडू नका. तीन इंचांपर्यंत पाणी घाला. यामुळे पाणी मुळांपर्यंत पोहचू शकेल. टांगलेल्या कुंडय़ांमधलं पाणी लवकर संपतं. अशा कुंडय़ांमधला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जेल किंवा क्रिस्टल्स घाला. सकाळी किंवा संध्याकाळी झाडांना पाणी घाला.
* वाळलेली रोपटी, गवत काढून टाका. नवी पालवी फुटण्यासाठी जागा करून द्या. रोपटय़ांची वरचेवर पाहणी करा. रोपटी मोठय़ा कुंडय़ांमध्ये लावा. ऋतूमानानुसार रोपटय़ांची निवड करा.
* कुंडय़ांमध्ये खत घाला. वाळलेली पानं, शेण, गोवर्या यापासून खत तयार करता येईल. खत घातल्याने रोपटय़ांना पोषण मिळेल. रोपटय़ांना ओलावा मिळेल.
* कोंब झाडांना घातलेलं पाणी शोषून घेतात आणि रोपटय़ांची वाढ खुंटते. त्यामुळे दिसताक्षणी हे कोंब उपटून टाका.