वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सिटी ओपन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानच्या केई निशिकोरीने एकेरीत विजयी सलामी देताना अमेरिकेच्या सॅम क्वेरीचा पराभव केला.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत जपानच्या निशिकोरीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले होते. निशिकोरीने सोमवारी झालेल्या एकेरीच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या सॅम क्वेरीचा 6-4, 6-3 असा पराभव केला. निशिकोरीने 2015 साली ही स्पर्धा जिंकली होती. कझाकस्तानचा बुबलीक आणि निशिकोरी यांच्यात दुसऱया फेरीचा सामना होईल. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या 20 वर्षीय ब्रुक्सबायने दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनचा 7-6 (7-4), 6-3, अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनने युक्रेनच्या मार्चेकोचा 4-6, 6-4, 7-6 (7-1), इटलीच्या सेप्पीने जपानच्या युचीयामाचा 3-6, 7-5, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.