कोरोनादरम्यान 8 टक्के लोकांमध्ये एकाकी राहण्याची वृत्ती
जपानच्या लोकांवर 20 व्या शतकाच्या प्रारंभी वरचढ ठरलेली हिकिकोमोरीची समस्या पुन्हा उग्र झाली आहे. हिकिकोमोरी सामाजिक समस्या असून ती युवांशी निगडित आहे. या समस्येने पीडित लोक अनेक दिवस, आठवडे किंवा महिन्यांपर्यंत समाज आणि परिवारापासून दूर स्वतःमध्ये हरवलेल्या स्थितीत राहणे पसंत करतात. यावेळी या समस्येने हिंसक स्वरुप धारण केले आहे. विशेषकरून कोरोना महामारीदरम्यान ही समस्या खूपच वाढली आहे.
शासकीय आकडेवारीनुसार जपानमध्ये यामुळे पीडित लोकांची संख्या 10 ते 15 लाख आहे. पण मनोवैज्ञानिकांनुसार सुमारे 1 कोटी म्हणजेच 8 टक्के लोकसंख्या या समस्येने ग्रस्त आहे. हिकिकोमोरीने ग्रस्त लोकांमध्ये आत्महत्येचा विचार दाटून येत असतो. तसेच ते इतरांना नुकसान पोहोचवू शकतात. अशा लोकांचे लक्ष्य विशेषकरून महिला होत असतात.
महिलाविरोधी पूर्वग्रह
जपानी समाजात महिलांच्या विरोधातील पूर्वग्रह कोरोनाकाळात मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. महिला आपल्यापेक्षा कमी क्षमतेच्या असल्याचे काही पुरुषांना वाटते. स्वतःच्या अधिकारांसाठी आवाज उठविणाऱया महिला अशा पुरुषांचे लक्ष्य ठरत असल्याचे उद्गार वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्या काजुनो हुतो यांनी काढले आहेत.
चाकूहल्ल्याची घटना
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी एका 36 वर्षीय युवकाने रेल्वेतून प्रवास करणाऱया लोकांवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात 10 जण जखमी झाले होते. पण या हल्ल्यात 20 वर्षीय युवती सर्वाधिक जखमी झाली होती. तिच्या पाठीवर चाकूने 10 हून अधिक वार करण्यात आले होते. हल्ल करणाऱया युवकाने पोलिसांकडून झालेल्या चौकशीदरम्यान आपण मागील 6 दिवसांपासून आनंदी दिसणाऱया महिलांना ठार करण्याच्या विचारात होतो असे सांगितले.