कुकुडवाड / वार्ताहर :
माण तालुक्यातील कुकुडवाड (म्हास्करवाडी) येथील शहीद जवान सुनील सूर्यवंशी यांचे नाव जम्मू-काश्मीरमधील एका रस्त्याला आणि कमानीला देण्यात आले आहे. कुकुडवाड म्हास्करवाडी येथील सुनील सूर्यवंशी हे चार वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील सियाचीन भागात हिमस्खलन होऊन शहीद झाले होते. त्यावेळी त्यांच्यासह शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह मिळवण्यासाठी केंद्र सरकार व संरक्षण खात्याला आठ दिवसाचा कालावधी लागला होता.
दरम्यान, सुनील सूर्यवंशी यांचे नाव जम्मू-काश्मीरमधील रस्त्याला आणि कमानीला दिल्याने महाराष्ट्रासह सातारा जिल्हा व दुष्काळी माण तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त सुभेदार शिवाजी काटकर यांनी दिली आहे.