प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील जयगड-गणपतीपुळे मार्गावरील उंडी येथे दुचाकी घसरून वृद्धाचा मृत्यू झाल़ा ही घटना बुधवारी सकाळी 10 च्या समारास घडल़ी बळीराम रामचंद्र घवाळी (62, ऱा उंडी रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े या अपघाताची नोंद रत्नागिरी जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळीराम घवाळी हे बुधवारी सकाळी परिसरातील राहणारे भालचंद्र लक्ष्मण घवाळी यांच्या दुचाकीवर मागे बसून उंडी ते खंडाळा जात होत़े उंडीगाव येथे दुचाकीचालक भालचंद्र हे तोंडावरचा मास्क सरळ करत असताना त्यांचा दुचाकीचा (एमएच 08 क्यू 2736) ताबा सुटल़ा यावेळी दुचाकी रस्त्याकडेला घसरून अपघात झाल़ा यामध्ये बळीराम घवाळी यांचा मृत्यू झाला तर लक्ष्मण घवाळी यांना दुखापत झाल़ी या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी यांनी लक्ष्मण घवाळी यांच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आह़े या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत़