बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रतिनिधी / बार्शी
बार्शी येथील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पुरस्कार ग्लोबल टीचर हा पुरस्कार प्राप्त झाला होता. माढा तालुक्मयातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ते ग्लोबल टीचर पर्यंतचा प्रवास आपल्या बुद्धिचातुर्य आणि कौशल्याने डिसले यांनी पार केला आहे. डिसले हे मूळ बार्शी येथील रहिवासी असून आज त्यांची निवड जागतिक बँकेच्या शिक्षण विभागाच्या सल्लागारपदी झालेली आहे.
रणजितसिंह डिसले यांनी शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र क्रांती केली आहे. प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक पाठÎपुस्तके त्यांनी एका क्मयू आर कोड मध्ये बंदिस्त केल्याने विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देणे खूप सोपे व सरळ झाले आहे. तसेच त्यांनी जागतिक स्तरावर शिक्षण, भाषा, संस्कार देवाण-घेवाण यासाठी खूप प्रयत्न केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चर्चेचे द्वार उघडून अनेक देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केले आहेत. या सर्वाची दखल घेऊनच डीसले यांना ग्लोबल टीचर हा मानाचा पुरस्कार दिला गेला असून आता रणजितसिंह डीसले यांना जागतिक बँकेने जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. जागतिक बँकेच्या शिक्षण विभागाच्या सल्लागारपदी त्यांची नेमणूक केली आहे. त्यांची ही नेमणूक म्हणजे बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.