सेलिब्रिटी कलाकार कोणत्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते जितके उत्सुक असतात तितकेच कलाकार सुट्टी एन्जॉय करण्यासाठी कुठे जातात आणि तिकडे काय काय मजा करतात हे पाहण्यासाठीही चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आता कलाकार त्यांच्या सोशलमीडिया पेजवर फोटो शेअर करत असल्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांची मजामस्ती पाहता येते. सध्या अभिनेत्री जान्हवी कपूर दुबईमध्ये बहीण खुशी कपूरसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. दुबईच्या रणरणत्या वाळवंटातील आणि काहीठिकाणी वॉटरगेम्स खेळतानाचे फोटोही जान्हवीने शेअर केले आहेत. बहीण खुशीसोबत जान्हवी नेहमीच भटकायला जात असते. मुळातच या कपूर बहिणींचे बाँडिंग छान आहे. त्यात दुबईतील पर्यटनस्थळांवर जान्हवी चांगलीच मूडमध्ये आली आहे. शोल्डरलेस टॉपमध्ये जान्हवीचे सौंदर्य चांगलेच झळाळून आले आहे. बुलेट राइडचे फोटोतून दिसत आहे. थोडक्यात काय, तर दीड वर्षापासून लॉकडाउनमुळे आलेला सगळा कंटाळा झटकून प्रत्येकजण पर्यटन एन्जॉय करत आहे. मग आपले सेलिब्रिटी कलाकार तरी कसे मागे राहतील. जान्हवीला दुबई खूप आवडते हे तिने अनेकदा सांगितले आहे, त्यामुळे अनलॉकनंतरच जान्हवीने दुबई ट्रीपचा प्लॅन केली होता.
Previous Articleअशोक लेलँड करणार बेंगळूर परिवहनला इलेक्ट्रिक बस पुरवठा
Next Article अमेरिकेत कोटय़वधींचे राजीनामा सत्र
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.