बेळगाव : जितो बेळगावतर्फे खानापूर तालुक्मयातील चिक्कदीनकोप्प येथील सरकारी शाळा दत्तक घेण्यात आली आहे. या शाळेत जितोतर्फे संगणक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. जितो फौंडेशन डे च्या निमित्ताने या शाळेला शैक्षणिक साहित्यही देण्यात आले. यामध्ये प्रयोगशाळेतील उपकरणे, खेळाचे साहित्य, शैक्षणिक भित्तीपत्रके आणि कपाट असे साहित्य देण्यात आले असून ते अनुक्रमे हजारे किचनवेअर, सीए सतीश मेहता, पारसमल पोरवाल, सीए जयकुमार पाटील आणि अन्य हितचिंतकांनी दिले आहे. संगणक अभ्यासक्रमाच्या सांगता समारंभात उद्योजक गोपाळ जिनगौडा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. ही शाळा दत्तक घेण्यासाठी विक्रम जैन यांनी पुढाकार घेतला. यावेळी राहुल हजारे, गुलाबचंद जैन, अभय हादिमनी, अंकित खोडा यांनी प्रमाणपत्रे वितरित केली. यावेळी दीपक सुभेदार, संजीव दोड्डण्णावर, जितोचे चेअरमन पुष्पक हणमण्णावर, सचिव अमित दोशी उपस्थित होते.
Previous Articleजीआयटी एमबीए विभागातर्फे डब्ल्यूआयई हॅकेथॉन स्पर्धा
Next Article नेताजी जाधव यांचा सत्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.