जागरुकतेने काम करण्याची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळय़ा ठिकाणी उभे करण्यात आलेल्या तपास नाक्मयांना भेटी देऊन जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी रविवारी पाहणी केली. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी वेगवेगळय़ा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात नियुक्ती करण्यात आलेल्या पथकांचे प्रमुख व सेक्टर अधिकाऱयांशी त्यांनी चर्चा केली.
रविवारी गोकाक, अरभावी, रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या पथकांच्या अधिकाऱयांशी स्वतंत्रपणे जिल्हाधिकाऱयांनी चर्चा केली. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून मुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिकाऱयांनी आवश्यक पावले उचलावीत, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली.
संपूर्ण राज्यात या एकाच मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे राज्याच्या नजरा बेळगाववर खिळल्या आहेत. म्हणून निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांनी नेहमी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपल्या अनुभवाचा वापर करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी तक्रारी आल्यास त्वरित पथकातील अधिकाऱयांनी त्या त्या ठिकाणी भेटी देऊन निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार संबंधितांविरुद्ध प्रकरणे नोंदवावीत. निवडणूक प्रचार सभा असोत किंवा राजकीय पक्षांच्या सभा व बैठका असोत, आचारसंहितेचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्याबरोबरच खर्चावरही बारकाईने नजर ठेवून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
गोकाक तालुक्मयातील गुर्लापूर क्रॉस, मालदिन्नी क्रॉस व यरगट्टी चेकपोस्टला भेटी देऊन तेथील कामकाजाची जिल्हाधिकाऱयांनी पाहणी केली. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी व निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.