अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 11 डिसेंबर 2021, दुपारी 12.30
● कोरोनाला हद्दपार करण्यात जिल्हा शेवटच्या टप्यात
● नव्याने होणारी बाधित वाढ रोखली
● परदेशातुन आलेले सर्वच जण ठणठणीत
● 2425 जणांचे झाल्या तपासण्या
सातारा / प्रतिनिधी :
जिल्हात कोरोना बाधित वाढ शून्याच्या दिशेने सुरू आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीचे दहा दिवस जिल्ह्यातील जनतेला चांगले गेले असून कोरोनामुक्तीच्या शेवटच्या टप्यावर जिल्हा आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटला तर परदेशी प्रवास करणाऱ्यांनी स्पर्श सुद्धा करू दिला नाही. त्यामुळे परदेशातुन आलेले सर्वच जण ठणठणीत आहेत. शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 2425 जणांचे गेल्या 24 तासात स्वॅब तपासणी करण्यात आले तर 12 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्याची वाटचाल शून्याच्या दिशेने
नोव्हेंबर महिना ज्या प्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांना सुखद ठरला तसेच डिसेंबर महिन्यातील पहिले दहा दिवस ही सुखद ठरले आहेत. नव्याने होणारी बाधित वाढ रोखण्यात यश आले असून पॉझिटिव्हीटी ही शून्याच्या खाली आणली आहे. तर बाधित वाढ ही 15 च्या आत आणण्यात आली आहे. येत्या काही दिवसात शून्य गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
परदेशातून आलेले सर्व ठणठणीत
ओमायक्रॉन नावाचा व्हेरियंट गेल्या पंधरा दिवसापासून जगात उजेडात आला. त्या व्हेरियंटच्या अनुषंगाने सुरुवातीला जगभर नुसता कांगावा करण्यात आला. जिल्ह्यातील काहीजण परदेशी गेले होते ते जिल्ह्यात परत आले होते अशाचा आरोग्य विभागाने सर्व्हे करून त्यांना सुरक्षितता म्हणून गृहविलीनीकरनात ठेवले होते परंतु या सर्वांनी दोन डोस घेतलेले असून नियम पाळल्याने ते सर्वजण ठणठणीत आहेत.
शनिवारी
नमुने-2425
बाधित-12
शनिवारपर्यंत
नमुने-23,29,611
बाधित-2,52,074
मृत्यू-6,483
मुक्त-2,44,639