प्रतिनिधी / सातारा :
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सातारा जिल्हय़ातील कोविड-19 अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. यापार्श्वभुमीवर बुधवार दि. 8 सप्टेंबर रोजी सातारा जिल्हय़ात कोविड-19 महालसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्हय़ात कोविशिल्ड लसीचे 1 लाख 41 हजार व कोव्हॅक्सीनचे 6 हजार 400 असे एकुण 1 लाख 47 हजार 400 डोस उपलब्ध असुन, उद्या महालसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. सातारा शहर विभाग, कराड, वाई, फलटण, कोरेगाव येथे लसीकरणकरीता ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. तसेच जिल्हय़ातील सर्व शासकिय रूग्णालय, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उप जिल्हा रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालय ये ही मोहिम राबविण्यात येणार आहे.