सातारा जिल्हा अँमँच्युअर तायक्वांदो असोसिएशनचा उपक्रम
औंध / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा अँमँच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे माध्यमातून सध्या जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंना घरबसल्या ट्रेनिंग सुरू असून जिल्ह्यातील 200 खेळाडू आँनलाईन ट्रेनिंग मध्ये सहभाग नोंदवून लाभ घेत आहेत.
लाँकडाऊन मुळे तब्बल दोन महिने मुले मैदानापासून आणि खेळापासून दूर आहेत. घरातील बैठे खेळ खेळून अनेकांना उबग आला आहे. त्यांना शारीरिक तंदुरुस्ती साठी व्यायामाची गरज आहे. यामुळेच सातारा जिल्हा तायक्वांदो अँमँच्युअर असोसिएशनच्या वतीने तायक्वांदो खेळाडूंना दररोज आँनलाईन ट्रेनिंग सुरू केले आहे. यामध्ये मुलांना तायक्वांदो खेळाला पूरक व्यायाम, लढतीचे आणि आहाराबद्दल मार्गदर्शन, खेळातील बदलेले नियम आदी बाबी उजळणी वर्गाद्वारे खेळांडू पर्यंत पोहचवणे फिजिकल फिटनेस बाबतीत घ्यावयाची काळजी याचे देखील मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमाला पालक आणि खेळाडूंचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असून तब्बल दोनशे खेळाडू या आँनलाईन ट्रेनिंग मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना असोसिएशनचे मार्गदर्शक गफार पठाण, विजय खंडाईत, संतोष संस्ते, अमोल पालेकर, संतोष पवार, रोहन जाधव, सुधीर लोहार, अक्षय खेतमर, हणमंत भोसले, प्रदीप जाधव, अमोल सावंत, रवींद्र मठपती, अकबर शेख, गणेश कांबळे, अक्षय कचरे, सुमित भंडलकर, यश खंडाईत, सचिन भंडलकर हे मार्गदर्शन करीत आहेत.
खेळाडू फार काळ खेळापासून दूर राहिला तर त्याचा परिणाम त्याच्या शालेय कामगिरीवर होतो. खेळातील कौशल्य विसरु नये आणि पुढील वर्षी शालेय तसेच असोसिएशनच्या स्पर्धेत त्यांची कामगिरी उठावदार व्हावी यासाठी असोसिएशनने आँनलाईन ट्रेनिंगचा उपक्रम सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. – गफार पठाण (खजिनदार सातारा जिल्हा अँमँच्युअर तायक्वांदो असोसिएशन)