आणखी एक पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 343 : कोरोना सक्रिय 74
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आणखी चार कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 263 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हय़ात मंगळवारी कणकवली तालुक्मयात वागदे येथे आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णसंख्या 343 वर गेली आहे. सद्यस्थितीत कोरोना सक्रिय रुग्ण 74 आहेत, अशी माहिती मंगळवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात गेल्या सात दिवसांत 63 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हय़ात पुन्हा कोरोनाचा वेग वाढू लागला आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून सोमवारी आणखी चार रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 263 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना सक्रिय चार रुग्ण घरीच आयसोलेशन करून उपचाराखाली ठेवण्यात आले आहेत, तर उर्वरित 43 रुग्ण जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचाराखाली आहेत. तसेच 34 संशयित रुग्णसुद्धा उपचार घेत आहेत.
मळगाव, कारिवडे, इन्सुली येथे कंटेनमेंट झोन
सावंतवाडी येथील मळगाव-देऊळवाडी, कारिवडे-जाधववाडी, इन्सुली-कुडवटेंब कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये 9 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इत्यादींना लागू असणार नाहीत, असे सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी म्हटले आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 5731
अहवाल प्राप्त झालेले नमुने 5601
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 343
निगेटिव्ह आलेले नमुने 5256
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 130
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 74
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 263
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 110
मंगळवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4917
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 16806
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 44
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13432
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3330
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 154925
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 35