प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण दोन लाख 48 हजार 186 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण नऊ हजार 796 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर सात हजार 97 जणांनी दुसरा डोस घेतला. नऊ हजार 874 प्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर पाच हजार 154 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 89 हजार 416 व्यक्तींनी पहिला डोस तर 30 हजार 602 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 87 हजार 856 नागरिकांनी पहिला डोस तर 15 हजार 622 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 51 हजार 244 जणांनी पहिला डोस तर सहा हजार 463 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण तीन लाख 13 हजार 124 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्हय़ाला आजपर्यंत एकूण तीन लाख एक हजार 620 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये दोन लाख 24 हजार 480 लसी या कोव्हिशिल्डच्या तर 77 हजार 140 लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत. तर दोन लाख 36 हजार 943 कोव्हिशिल्ड आणि 76 हजार 181 कोव्हॅक्सिन असे मिळून तीन लाख 13 हजार 124 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्हय़ातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण दोन हजार 420 लसी उपलब्ध असून त्यापैकी एक हजार 40 कोव्हिशिल्डच्या आणि एक हजार 380 कोव्हॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्हय़ात सध्या तीन हजार 490 लसी शिल्लक असून त्यापैकी तीन हजार 230 कोव्हिशिल्ड आणि 260 कोव्हॅक्सिनच्या लसी शिल्लक आहेत.