प्रतिनिधी / कोल्हापूर
महसूल विभागातील लिपिक आता महसूल सहाय्यक झाले आहे. शासनाने नुकताच हा पदनाम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ जिह्यातील 288 लिपिकांना होणार आहे. गेल्या 33 वर्षांपासून महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सुरू असलेल्या लढय़ाला यश आले आहे.
महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील महसूल शाखा, कुल वहिवाट शाखा, सामान्य शाखा, लेखा शाखा, आस्थापना शाखा, जिल्हा नियंत्रण कक्ष, उपचिटणीस शाखा, पुनर्वसन शाखा, भूसंपादन शाखा, गौण खनिज शाखा, रोजगार हमी योजना शाखा, संजय गांधी शाखा आदी विविध शाखांमार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकायांना कराव्या लागणाया कामाच्या मूलभूत माहितीचे संकलन, टिप्पणी सादरीकरण तसेच विविध मसुदे तयार करण्याचे काम महसूल विभागांतर्गत लिपिक गट ’क’ कर्मचायांद्वारे केले जाते.
याचबरोबर सूनवण्या, नैसर्गिक आपत्ती, कायदा सुव्यवस्था, निवडणूक आदी कामे करताना संबंधित अधिकायांना मदत करण्याचे काम ही लिपिक करत असतात. त्यामुळे एक पदापुरते मर्यादित काम न करता व्यापक काम करणाया लिपिकांचे पदनाम बदलून त्यांना महसूल सहाय्यक हे सन्मानजनक पद मिळावे, अशी मागणी राज्य महसूल संघटनेतर्फे 18 जुलै 1988 पासून होती. त्यासाठी आंदोलने, सरकारशी चर्चा या माध्यमातून संघटनेचा पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून सरकारने ही मागणी मान्य केली आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी काढण्यात आला. या निर्णयामुळे महसूल कर्मचायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पदनाम बदलले तरी स्वतंत्र वेतनश्रेणी नाही
सरकारने लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्याची मागणी मान्य केली आहे. असे असले तरी वेगळी वेतनश्रेणी किंवा वेतनवाढ दिली जाणार नसल्याचे शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
जबाबदाऱयाही कमी व्हाव्यात
फक्त पदनाम बदलून काही उपयोग नाही, महसूलच्या लिपिकाकडे असलेली कामे आणि इतर विभागातील लिपिकांकडील कामे यात खुप फरक आहे. महसूलच्या लिपीकाकडे त्याच्या सेवाकार्यकाळात जवळपास 22 प्रकारच्या जबाबदाया पार पाडाव्या लागतात. तुलनेत इतर शासकीय विभागातील लिपिकाची कार्यपद्धती निवृत्तीपर्यंत तिच राहते, त्यामुळे महसूल लिपिकाचे नुसते पदनाम बदलून चालणार नाही तर जबाबदाया ही कमी झाल्या पाहीजेत, अशा भावना काही कर्मचाऱयांनी व्यक्त केल्या.
जिह्यात मंजूर 288 पैकी कार्यरत 241
जिह्यात महसूल विभागात लिपिकांची 288 पदे मंजूर असून त्यातील 241 पदे कार्यरत आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. असे असले तरी सर्वच मंजूर पदांकरिता महसूल सहाय्यक या पदनामाचा लाभ होणार आहे.
सरकारच्या निर्णयाचे स्वागत
महसूलमधील लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करावे, अशी मागणी गेल्या 33 वर्षांपासून सरकारकडे केली जात आहे. यासाठी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने, सरकारसोबत चर्चा असा पाठपुरावा केला जात होता. त्याला यश आले असून सरकारने ही मागणी मान्य करून अंमल बाजावणीही सुरू केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे.
विलासराव कुरणे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना