मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडून नियुक्त्या : तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याच निवडणुका होऊ शकत नसल्याने, ऑगस्ट 2020 पर्यंत मुदत संपणाऱया ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी सोमवारी जिल्हय़ातील सत्तरही ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. हे सर्व प्रशासक शासकीय कर्मचाऱयांमधून नेमण्यात आले आहेत.
दरम्यान, सद्यस्थितीत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, अशा ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी प्रशासक म्हणून शाखा अभियंता ते केंद्रप्रमुखापर्यंतच्या शासकीय व्यक्तींची नियुक्ती केली आहे. जिल्हय़ातील एकूण 70 ग्रामपंचायतींची मुदत 2 ते 12 ऑगस्ट या कालावधीत संपली असून या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.
सावंतवाडी तालुका : मळगाव – गणपत लोंढे (विस्तार अधिकारी कृषी), इन्सुली प्रशांत चव्हाण (कृषी अधिकारी), चौकुळ सुजित येरवलकर (विस्तार अधिकारी), मळेवाड गजानन धर्णे (विस्तार अधिकारी), आंबोली कांतीलाल वळवी (विस्तार अधिकारी सांख्यिकी), तळवडे एकनाथ सावंत (विस्तार अधिकारी कृषी), दांडेली शारदा नाडेकर (कृषी अधिकारी), आरोस प्रमोद जोईल (शाखा अभियंता लघु पाटबंधारे), आरोंदा सुदेश राणे (शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग), डिंगणे ओमप्रकाश शिंदे (कनि÷ अभियंता, बांधकाम विभाग), कोलगाव प्रकाश मोरे (विस्तार अधिकारी, एकात्मीक ग्राम विकास प्रकल्प).
वैभववाडी तालुका – सांगुळवाडी – रामचंद्र जाधव (केंद्रप्रमुख वैभववाडी), नाधवडे यशवंत वळवी (केंद्रप्रमुख नाधवडे), सोनाळी – देविदास सूर्यवंशी (केंद्रप्रमुख सोनाळी), कुंभवडे – संतोष गोसावी (केंद्रप्रमुख कुंभवडे), ऐनारी – विजय केळकर (केंद्रप्रमुख हेत), लोरे नंबर 2 – गौतम तांबे (केंद्रप्रमुख हेळेवाडी), कोकिसरे – शिवाजी पवार (केंद्रप्रमुख खांबाळे), वेंगसर – निसार नदाफ (विस्तार अधिकारी, शिक्षण पंचायत समिती वैभववाडी), मांगवली – अशोक वडर (विस्तार अधिकारी, शिक्षण वैभववाडी), भुईबावडा – लक्ष्मण हांडे (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग), खांबाळे – विशाल चौगुले (विस्तार अधिकारी सांखिकी पं. स. वैभववाडी), आचिर्णे – शशिकाम भरमर (कृषी अधिकारी, पं. स. वैभववाडी), एडगाव – सुधाकर जाधव (कृषी अधिकारी वैभववाडी).
मालवण तालुका – कुणकवळे – कृष्णा पाताडे (विस्तार अधिकारी, कृषी पं. स. मालवण), मसदे-चुनवरे – अंकुश मुणगेकर (विस्तार अधिकारी कृषी मालवण), गोळवण कुमामे – विनायक जाधव (विस्तार अधिकारी कृषी मालवण), खरारे पेंडुर – श्रीकृष्ण सावंत (विस्तार अधिकारी सांख्यीकी, मालवण), आडवली-मांडली – पी. डी. जाधव (विस्तार अधिकारी, मालवण), चिंदर – आर. जी. कांबळे (कृषी अधिकारी, मालवण).
वेंगुर्ला तालुका – सागरतीर्थ – बी. एस. केरवडेकर (विस्तार अधिकारी, वेंगुर्ला), आरवली – संदेश परब (विस्तार अधिकारी वेंगुर्ला).
कणकवली तालुका : भिरवंडे ग्रा. पं. – सूर्यकांत वारंग (विस्तार अधिकारी कणकवली), तोंडवली-बावशी – आर. एल. शिंदे (विस्तार अधिकारी कणकवली), गांधिनगर – रविकांत मेस्त्राr (विस्तार अधिकारी, कणकवली).
दोडामार्ग तालुका – तेरवण मेढे – यशवंत गवस (विस्तार अधिकारी दोडामार्ग), आयनोडे-हेवाळे – सुजीत गायकवाड (विस्तार अधिकारी दोडामार्ग), कुडासे – गिरनोल डिसोजा (विस्तार अधिकारी दोडामार्ग).
कुडाळ तालुका : गोवेरी – संजयकुमार ओरोसकर (विस्तार अधिकारी कुडाळ), वाडोस – सखाराम सावंत (विस्तार अधिकारी पं. स. कुडाळ), गोठोस – नितीन नानचे (विस्तार अधिकारी कुडाळ), आकेरी – दत्ताराम आंबेरकर (विस्तार अधिकारी कुडाळ), गिरगाव-कुसगाव – लक्ष्मीकांत डुबळे (जलसंधारण अधिकारी लघुसिंचन उपविभाग कुडाळ), कुपवडे – रामचंद्र जंगले (विस्तार अधिकारी कुडाळ), वसोली – मंगेश जाधव (विस्तार अधिकारी, पं. स. कुडाळ), पोखरण-कुसबे – महादेव खरात (विस्तार अधिकारी पं. स. कुडाळ), माडय़ाचीवाडी – मंगेश हवालदार (जलसंधारण अधिकारी लघु सिंचन विभाग कुडाळ).
देवगड तालुका – धालवली – निर्मला समजिस्कर (केंद्रप्रमुख, पं. स. देवगड), गडीताम्हाणे – सुदाम जोशी (केंद्रप्रमुख), ईळये – राखी राणे (मुख्य सेविका पं. स. देवगड), कातवण – उल्हास मुंबरकर (केंद्रप्रमुख), कोरले – लहू दहिफळे (केंद्रप्रमुख), कुणकेश्वर – अंकुश जंगले (विस्तार अधिकारी पं. स. देवगड), लिंगडाळ – भाग्यश्री जोईल (केंद्रप्रमुख), मिठबाव – संतोष बिर्जे (कक्ष अधिकारी पं. स. देवगड), मोंड – श्रीरंग काळे (विस्तार अधिकारी पं. स. देवगड), मोंडपार – प्रल्हाद पायघन (विस्तार अधिकारी देवगड), मुणगे – अक्षता देसाई (मुख्य सेविका पं. स. देवगड), मुटाट – प्रकाश तिर्लोटकर (केंद्रप्रमुख पं. स. देवगड), नाडण – आनंदराज राजम (केंद्रप्रमुख), पाळेकरवाडी – बाबली होडावडेकर (विस्तार अधिकारी पं. स. देवगड), पाठथर – रुपाली खोत (मुख्य सेविका देवगड), पुरळ – पांडुरंग राजम (केंद्रप्रमुख पं. स. देवगड), रहाटेश्वर – शुभांगी सावंत (केंद्रप्रमुख), शिरगाव – विनायक पाटील (विस्तार अधिकारी पं. स. देवगड), तळवडे – दिगंबर खराडे (कृषी अधिकारी पं. स. देवगड), तांबळडेग – स्नेहा पारकर (केंद्रप्रमुख), टेंबवली – श्रीमती प्रतिमा वळंजू (आरोग्य पर्यवेक्षिका पं. स. देवगड), वाडा – अशोक जाधव (पं. स. देवगड) आणि वरेरी – महेंद्र लांबोरे (केंद्रप्रमुख पं. स. देवगड),
या सर्वांनी ज्या दिवशी संबंधित ग्रामपंचायतीची मुदत संपली असेल त्या दिवसापासून आपला कार्यभार स्वीकारायचा असून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे आदेश डॉ. वसेकर यांनी दिले आहेत.